Anganwadi Supervisor Recruitment: अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० जागांसाठी सरकारकडून नवीन भरती काढण्यात आलेली आहे. या पदासाठी अर्ज कसा करायचा आहे? येथे जाणून घ्या.
Government Jobs For Womens: अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आणि खूप महत्त्वाची बातमी आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी ४०,००० रिक्त पदांसाठी भरती सुरू आहेत. ही भरती पदवीधारकांसाठी सुरू असून, कुठलीही परीक्षा द्यावी लागणार नाही. या पदासाठी पात्र ठरण्यासाठी काय आहेत निकष? कसा अर्ज करायचा? जाणून घेऊया.
अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधी आलेली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन किंवा ऑफलाईन असू शकतात. ही अर्ज करण्याची पद्धत जानेवारी २०२४ मध्ये सुरू होईल आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये समाप्त होईल. या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवाराचं वय हे १८ ते ४५ च्या मध्ये असणं गरजेचं आहेत. या पदासाठी पगार हा १८ हजार रुपये इतका असणार आहेत. अंगणवाडी भरतीसाठी जे वाट पाहत होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी दिली आहे.
अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाबाबत संपूर्ण माहिती
पदाचे नाव – अंगणवाडी पर्यवेक्षिका
एकूण रिक्त पदे – ४०,०००
वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्ष
पदवी – ( राज्यानुसार बदलेल)
अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन/ ऑफलाईन
पगार – ८,००० ते १८,०००
निवड प्रक्रिया – गुणवत्ता यादी ( परीक्षेची गरज नाही)
अधिकृत संकेतस्थळ – www.wcd.nic.in ( या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकतात
शैक्षणिक पात्रता –
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष असणं हे गरजेचं आहे.