Crop insurance 2024 : यंदा ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबर च्या सुरुवातीला राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. काही जिल्ह्यात ढगफुटी झाली तर काही जिल्ह्यात वारे आणि जोरदार पावसाचा पिकांना मोठा फटका बसलेला आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसान ग्रस्त भागातील पंचनामे करणे सुरू आहेत.
Crop insurance
पिक विमा 25% विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याविषयी खाली यूट्यूब व्हिडिओ नमूद केलेला आहे तो पाहून तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
अतिवृष्टीने मोठा फटका बसलेल्या हिंगोली जिल्ह्यातील सर्वच महसुल मंडळात 25% अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा कृषी अधिक्षक राजेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने वेगवेगळ्या गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली असता 50% पेक्षा अधिक नुकसान झालेले निदर्शनास आलेले आहे. ( Crop insurance 2024 )
: ई श्रम कार्ड असल्यास मिळत आहेत महिन्याला 3,000 रुपये, असा करा ऑनलाईन अर्ज!
नुकसानीची पाहणी करून 50% पेक्षा अधिक नुकसान झालेले पाहिले असता हिंगोली जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळासाठी 25% अग्रीम पिक विमा मंजूर केलेला आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने हा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या कडे सुपुर्त केलेली आहे.
नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी 25% अग्रीम पिकविम्यासाठी अधिसूचना काढलेली आहे. जिल्ह्यात तुर, कापूस, बाजरी, मुग, उडीद, सोयाबीन या सर्व पिकांचे नुकसान झालेले आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी सोयाबीन पिकांसाठी 25% अग्रीम पिकविम्यासाठी अधिसूचना काढलेली आहे.( Crop insurance 2024 )
सोयाबीनच्या अग्रीम पिकविम्यासाठी जिल्ह्यातील जवळपास 3 लाखांपेक्षा अधिक शेतकरी पात्र होणार आहे. आणि या 3 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 150 कोटी रुपयापर्यंत पिक विमा वाटप केला जाईन अशी शक्यता आहेत.
राज्यात सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे मोठे नुकसान झालेले आहे. जसे इतर जिल्ह्याची माहिती मिळेल तसेच त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करू तरी अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आपला whatsaap ग्रुप जॉईन करावा