Crop Insurance ( पिक विमा ) : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सध्या पीकविमा रक्कमेच्या प्रतीक्षेत असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील तब्बल 116 तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ असल्याचे निदर्शनात आले असून आता शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यावर्षी राज्यभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झालेले आहे. आणि पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगामातील पीक हे निघून गेलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे.
पिक विमा माहिती 2023
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यात 25 टक्के अग्रीम रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ती वितरित करण्याच्या आदेश देखील विमा कंपनीला दिलेले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये विमा कंपनीकडून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती विमा कंपनीने राज्य सरकारला दिलेली आहे.
हे पण महत्त्वाचं वाचा..! 📣📝👉 सरकार मुलींच्या खात्यात 75 हजार रुपये पाठवत आहे! लगेच लाभ घ्या
सुरुवातीला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात 25% अग्रीम रक्कम वाटप करण्यास विमा कंपनीने नकार दिलेला होता. परंतु महाराष्ट्र सरकार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये झालेल्या संवादातून शेवटी असा निष्कर्ष निघालेला आहे. की, विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच आगाऊ 25 टक्के रक्कम विमा मिळण्यास काही प्रमाणावर अडचणी निर्माण होत होत्या. परंतु महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली, परभणी, बीड , नागपूर,अकोला,धाराशिव,परभणी,जालना,अमरावती , यांच्यासाठी कोणताही आक्षेप नोंदविण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी कोणतीही अडचण आलेली नव्हती अशा प्रकारची माहिती देखील प्रसार माध्यमांशी बोलत असताना जाहीर केलेली आहे.
नागपूर,अकोला,धाराशिव,परभणी,जालना,अमरावती या जिल्ह्यांतील पिक विम्यासाठी कंपन्यांकडून आक्षेप घेतला गेला नसल्याने आता शेतकऱ्यांना रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 25% अग्रीम पीकविमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या टप्प्यात 04 नोव्हेंबर पासून जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आणि वरील सर्व जिल्हे अशा सर्व पात्र महसूल मंडळांना दिनांक 4 नोव्हेंबर पर्यंत पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने विमा कंपनीला दिलेली असून ही रक्कम चार नोव्हेंबर पासून 25% अग्रीम रक्कम आणि 25% अगाऊ रक्कम अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती सरकारने नुकतीच जाहीर केलेली आहे.
त्याचबरोबर अकोला, यवतमाळ , बुलढाणा, वाशिम , सांगली, आशा जिल्ह्याचे व मराठवाड्यातील जिल्ह्यांचा देखील पिक विमा मिळण्याचा मार्ग आज मोकळा झालेला असल्याने या जिल्ह्यांसोबतच बाकी सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पिक विमा 25% अग्रीम रक्कम मिळणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली असल्याने लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे.