Crop loan: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगाव मधील जिल्हा बँकेने ३ लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे (Crop loan) व्याज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील २ लाख ९० हजार शेतकऱ्यांना ७२ कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ३ लाख रुपये पर्यंत पीक कर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतरच्या काळामध्ये पुन्हा एक आदेश काढून व्याजासहित कर्ज वसूल करण्याचे सांगितले होते. यामुळे शेतकऱ्यांवर मोठा बोजा पडणार होता. (Crop loan)
2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)
या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात ३ लाख रुपये पर्यंत पीक कर्ज घेतले. आणि ३१ मार्च २०२४ पर्यंत ते कर्ज पूर्णपणे फेडले आहे, अशा शेतकऱ्यांना व्याजाचा लाभ मिळणार आहे. (Crop loan) थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी मात्र हा निर्णय लागू होणार नाही.
श्री. पवार यांनी या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल, असेही सांगितलेले आहे.