Imd Alert: नमस्कार मित्रांनो येत्या दोन-तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात बऱ्याचशा भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पण असल्याची माहिती देखील हवामान खात्याने नुकतीच जाहीर केलेली आहे. आणि सध्या बुलढाणा जिल्ह्यात सह महाराष्ट्र महाराष्ट्रात बरेचसे ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि उर्वरित ठिकाणी देखील लवकरच पाऊस येणार असल्याची माहिती पंजाब डक यांनी हवामान अंदाज वर्तवताना जाहीर केलेली आहे.
सध्या महाराष्ट्रात बऱ्याच शहरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. याबरोबरच बुलढाणा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. तसेच इकडे पुणे मध्ये देखील पावसाला सुरुवात झालेली असून दौंड तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. याचबरोबर येत्या दोन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र बरोबर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांसोबतच पूर्व विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.
हे पण महत्त्वाचं आहे 👉 महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! | Maharashtra New Districts List Announced
अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बंगालच्या उपसागरामधून बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात झालेली आहे. परिणामी काही भागातून थंडी गायब झालेली असली तरी काही भागांमध्ये अतिशय थंडीचे वातावरण पसरलेले आहे. आणि महाराष्ट्र मध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आशा मध्येच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात पाऊस होणार असल्याची माहिती पंजाब डख यांनी आपला हवामान अंदाज वर्तवत असताना जाहीर केलेली आहे..
भारतीय हवामान खात्याचा अंदाजानुसार पुढील 72 तासांमध्ये दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भातील तुरळक जिल्ह्यांस बुलढाणा जिल्ह्यात मध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोकणासह रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज देखील नुकताच वर्तवण्यात आलेला आहे.
दुसरीकडे धुळे नंदुरबार येथे देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून येथे सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर जळगाव नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील येतात तीन ते चार दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील अशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे.
मराठवाडा विभागासह छत्रपती संभाजीनगर येथे येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे अशा प्रकारची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.
याबरोबरच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच सोलापूर, बीड, बुलढाणा, आणि अकोला या ठिकाणी देखील येत्या दोन दिवसांमध्ये हलका पावसात सुरुवात होईल. अशा प्रकारची माहिती ही हवामान खात्याने जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी. अशा प्रकारचा सल्लाही देण्यात आलेला आहे.