Saving Bank Account: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज करण्यासाठी महिलांना पुन्हा एक संधी सरकारने दिलेली आहेत. 02 सप्टेंबर रोजी लाडकी बहिण योजनेचा पुन्हा एक नवीन शासन निर्णय आलेला आहेत. या शासन निर्णयानुसार महिलांना फक्त दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहेत तसेच या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्यापासून योजनेचा लाभ मिळणार आहे.
Saving Bank Account
लाडकी बहिण योजनेचे अर्ज करण्यासाठी हि शेवटची तारीख आली
वयाची अट तसेच इतर कागदपत्रे पुर्ण नसलेल्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केलेले नाही. तरी राज्य सरकारने 02 सप्टेंबर रोजी लाडकी बहिण योजनेचा नवीन शासन निर्णय घेतलेला आहे. या नव्या शासन निर्णयानुसार महिलांना लाडकी बहिण योजनेसाठी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. तरी महिलांनी तातडीने दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज करावेत असे निर्देश शासनाने दिले आहेत.
1 सप्टेंबर पासून या नियमात बदल, वाचा दैनंदिन जीवनावर काय होणार परिणाम?
या महिलांना फक्त आता सप्टेंबर महिन्यापासून योजनेचा लाभ मिळणार आहे
लाडकी बहिण आतापर्यंत महिलांना जुलै महिन्यापासून योजनेचा लाभ सरकारने दिला आहेत. परंतु सप्टेंबर मध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्यापासून योजनेचा लाभ मिळणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिण्याचे दोन हप्ते सप्टेंबर मध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना मिळणार नाहीत. असे शासन निर्णयानुसार स्पष्ट झालेले आहे.( Saving Bank Account)
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे. की महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज पुर्ण करावेत जर शासनाने लाडकी बहिण योजनेच्या अर्जाची तारीख वाढवली तर त्याबद्दल माहिती दिली जाईन.
तसेच ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नाही. अशा महिलांनी आपल्या बॅंकेशी आधार कार्ड लिंक करावेत. तसेच आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव करावेत. लाडकी बहिण योजनेचे पैसे DBT द्वारे थेट महिलांच्या आधार लिंक बॅक खात्यात जमा केले जाते.त्यामुळे बँकेला आधार लिंक असने अतिशय आवश्यक आहेत.