Ladki Bahin Yojana Today Update: दि. 05 डिसेंबर रोजी सायंकाळी 05:00 वाजता नवीन सरकार ची स्थापना झालेली आहे. मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी शपथ घेतलेली आहे. या शपथविधी कार्यक्रमाला देशातून 22 राज्याचे मुख्यमंत्री तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते.
शपथविधी कार्यक्रम पुर्ण झाल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. यामध्ये पत्रकाराने लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना 2,100 रूपये कधीपासून मिळणार तसेच योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार नाहीत याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात. ते सविस्तर पाहुयात
लाडकी बहीण योजना…अन्यथा 2100 रूपये मिळणार नाहीत; लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना सध्यस्थितीत 1500 रूपये चालू राहणार आहे. व बजेटमध्ये तरतूद करुन पुढे महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2,100 रूपये दिले जातीन. डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत.
कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!
अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्या तुन लाडकी बहिण योजनेचे निकष बदलणार असल्याच्या बातम्या येत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत की ज्या महिला योजनेचे निकष डावलून लाभ घेत असतील तर अशा महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाहीत. एकंदरीत अर्जाची तपासणी होऊन महिलां योजनेच्या निकषाप्रमाणे लाभ घेत आहेत का? याबाबत फेर तपासणी केली जाणार आहेत.