Maharashtra Taluka News: महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे. जिल्ह्यापासून जास्त अंतरावर असलेल्या गावातील जिल्हा कार्यालय तसेच इतर शासकीय कामासाठी ये जा करण्यासाठी जास्त धावपळ होत असल्याने नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार अशी माहिती समोर येत होती. परंतु राज्यात नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार का याबाबत हिवाळी अधिवेशनात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
महसूल मंत्री विखे पाटील हिवाळी अधिवेशनात म्हणाले कि राज्य सरकार नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी सकारात्मक नसून नवीन तालुक्याची निर्मिती करण्यासाठी सकारात्मक आहे. गावातील शेतकरी तसेच इतर नागरीकांना तहसील कार्यालय जास्त अंतरावर असल्याने भरपूर कामे करण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे राज्य सरकार नवीन तालुक्याची निर्मिती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर 2023 येथे सांगितले आहे.
हे पण वाचा – आयुष्मान कार्ड आता सर्वांना मिळणार; तुमच्या मोबाईल वरून असे काढा ( Ayushman Bharat Card Apply Maharashtra )
सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. मात्र लवकरच ही तालुक्याची संख्या आणखी वाढणार आहे. महाराष्ट्र राज्य शासन राज्यात नवीन तालुक्यांची निर्मिती करणार आहे. शेतकरी तसेच नागरिकांना तहसील तसेच इतर तालुक्याची कामे करण्यासाठी जास्त अंतर असलेल्या तालुक्याचे विभाजन करून तालुक्याची संख्या वाढणार असल्याची माहिती महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिली आहे. सध्या असलेल्या 358 तालुक्यापैकी कोणत्या तालुक्याचे विभाजन होणार असून नवीन तालुक्याची निर्मिती होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लवकरच याबाबत शासनाकडून माहिती दिली जाणार आहे.व त्यानंतर नवीन कोणत्या तालुक्याची निर्मिती होणार हे स्पष्ट होणार आहे.