Mobile Recharge TRAI New Rule: Jio, Airtel, Vi आणि BSNL ग्राहकांना लवकरच स्वस्त रिचार्ज पर्याय मिळणार आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने सर्व दूरसंचार ऑपरेटरना त्यांच्या ग्राहकांसाठी कॉलिंग आणि एसएमएस-केंद्रित योजना सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहे.
जर टेलिकॉम ऑपरेटर्सच्या रिचार्ज प्लान पाहिले तर असे दिसते की युजर्सना मिळणाऱ्या सर्व रिचार्ज सेवा डेटावर आधारित आहे. म्हणजेच कॉम्बो रिचार्ज प्लानमध्ये कॉलिंग, एसएमएस आणि डेटा या तिन्ही सेवा मिळत आहे.अशा रिचार्ज प्लानमध्ये अनेक युजर्सना डेटाची गरज नसताना सुद्धा डेटासाठी पैसे खर्च करावे लागत असतात.
जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया कंपनीच्या युजर्सना सिमकार्ड सक्रिय ठेवण्यासाठी दर महिन्याला कमीत कमी 200 रुपये खर्च करावे लागत आहेत. ट्रायने यापूर्वीही यासंदर्भात कंपन्यांकडून सूचना मागवल्येल्या होत्या, ज्यात टेलिकॉम कंपन्यांनी स्पष्ट विरोध केलेला होता.
टेलीकॉम कंपनीने अशा कोणत्याही नव्या रिचार्ज प्लानची गरज नसल्याचे सांगितलेले होते. कंपन्यांनी सांगितले होते की ते असे रिचार्ज प्लान ग्राहकांसाठी आम्ही देत आहेत.
आणि खरी वास्तविक परीस्थिती पाहिली तर सिमकार्ड कंपन्यांनी काही वर्षांपूर्वी आजीवन मोफत इनकमिंग कॉलची सुविधा बंद केलेली आहेत.
परंतु नवीन वर्षात मोबाईल यूजर्सना स्वस्त रिचार्ज प्लान मिळू शकता. मोबाईला वापरणाऱ्या ग्राहकांना आता इंटरनेट डेटा न घेताही रीचार्ज करता येणार आहेत. ग्राहकांना फक्त कॉलिंग आणि एसएमएस साठी प्लान्स द्या असे आदेश टेलिकॉम कंपन्यांना ट्रायने दिलेले आहे. त्यामुळे केवळ कॉलिंग साठी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळणार आहेत.