New Education Policy Rule 2023 : महाराष्ट्र शासनाने इयत्ता तिसरी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी सर्वात महत्त्वाची घोषणा करून विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. आणि आगामी शैक्षणिक वर्ष 2023 – 24 पासून राज्यांमध्ये लागु करण्यात येईल. सर्व सरकारी शाळांमध्ये मधील विद्यार्थ्यांना वही ची पाने असलेली पाठ्यपुस्तके चाचणीतत्त्वावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती नुकतीच राज्य शासनाकडून देण्यात आलेली आहे. ही पद्धती ३री ते १० वी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांमध्ये लागू केली जाणार आहे.
या शाळेच्या पाठ्यपुस्तकात प्रत्येक धडा, युनिट, किंवा कवितेच्या, शेवटी दोन ते चार पानांच्या नोटबुक समाविष्ट केल्या जाणार आहेत. आणि शिक्षक वर्गात शिकवत असताना विद्यार्थ्यांना या पानावर नोट्स लिहून घेण्यात प्रोत्साहित केले जाणार आहे. जसे की महत्त्वाचे शब्दार्थ, सूत्रे, महत्वाची माहिती, अनोळखी माहिती, इत्यादी पाने “माय नोट” या शिर्षकाच्या खाली पुस्तकांमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत.
New Education Policy Rule 2023
महाराष्ट्र शासनाने या विद्यार्थ्यांसाठी केलेली ही सर्वात महत्त्वाची निवड मानली जात आहे. आणि राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यांचे शिक्षण व शैक्षणिक साहित्याचे सार्वत्रिकरण करणे, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवणे, पाठ्यपुस्तके आणि नियमावलीच्या वजनामुळे दप्तरांचे वाढते, ओझे तसेच दप्तरांच्या वाढत्या वजनाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा वाईट परिणाम आणि गरीब शेतकऱ्यांची मुले, राज्याच्या ग्रामीण शाळेमध्ये जाताना पूर्वीचे लेखन साहित्य घरातून उपलब्ध होत नसते.
प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra
या सर्व गोष्टींचा विचार घेऊन शिक्षण तज्ञ, आणि शिक्षक, राज्य शैक्षणिक संशोधन, आणि प्रशिक्षण परिषद, राज्य परीक्षा मंडळ, आणि बालभारती अधिकारी, यांच्याशी संवाद साधण्यात आलेला असून या निर्णयाच्या क्रमानुसार या तज्ञ गटांनी सर्वसमावेशक चर्चा करून याविषयी निर्णय दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये नवीन पाने जोडण्याबाबत चांगला अभिप्राय प्राप्त झाला असून याविषयी सर्वच सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. ( New Education Policy Rule 2023 : ३री ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय..!)
विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातील प्रश्नांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना सराव प्रश्नसंच, वर्गातील कार्य, गृहपाठ, इत्यादींसाठी स्वतंत्र नोटबुक ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच पाठ्यपुस्तकांमध्ये नोटबुकची पाने जोडल्यामुळे पुस्तकाचा आकार , वजन आणि खर्च वाढतो. या संदर्भात अंमलबजावणीसाठी एक आवश्यक दृष्टिकोन प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून नुकती देण्यात आलेली आहे. (New Education Policy Rule 2023 : ३री ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय..!)