Pm Kisan E-kyc: राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा १५ वा हप्ता मिळाला असून आता शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. राज्यातील ४ लाख शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा १६ हप्ता मिळणार नाही.
या शेतकऱ्यांना का मिळणार नाही पीएम किसान चा १६ वा हप्ता त्या संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
आयुष्मान कार्ड आता सर्वांना मिळणार; तुमच्या मोबाईल वरून असे काढा ( Ayushman Bharat Card Apply Maharashtra )
राज्यातील शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासाठी १५ जानेवारी २०२४ पर्यंत हि डेडलाईन देण्यात आली होती. मात्र आतापर्यंत ४ लाख शेतकऱ्यांची ई केवायसी बाकी आहे.
त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यास अनेक शेतकऱ्यांना अडचणी येऊ लागल्या आहे. pm kisan ekyc
पीएम किसान निधीचा १४ वा हप्ता वाटप केला जात असता वेळी तीन अटीचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात अवघी 75 लाख होती.
परंतु कृषी विभागाने सातत्यान प्रयत्न करत १५ व्या हप्त्याच्या वाटपावेळी हि संख्या 85 लाखावर नेली राज्यात सध्या सुरु असलेल्या ई केवायसी मोहिमुळे आतापर्यंत 86.68 लाख शेतकऱ्यांना योजनेच्या कक्षेत आणण्यात आलेले आहे.
ई केवायसीसाठी ६ डिसेंबर २०२३ पासून राज्यात विशेष मोहीम सुरु करण्यात आलेली आहे.
- अशाप्रकारे करा तुमच्या शेतातून ई केवायसी
- पहिल्यांदा पीएम किसान https://pmkisan.gov.in/ योजनेच्या या अधिकृत वेबसाईटवर जा
- त्यानंतर मुख्यपुष्टावर ई केवायसी पर्यायावर क्लिक करावे
- आता त्यात आधार कार्ड आणि कॅपच्या कोड टाकावे.
- त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करां आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकावा.
- मोबाईलवर आलेला ओटीपी टाका सबमिट पर्यायावर क्लिक करायचे.
- अशा पद्धतीने तुम्हाला ई केवायसी पूर्ण करता येईल.