Sanjay Raut l राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेल आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झालं आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर महाविकास आघाडीतील नेतेमंडळी वारंवार निशाणा हा साधत आहेतच. अशातच आता या योजनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे.
महिलांना पैसे दिलेत ते काढून घेऊ नका :
यावेळी संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहीण योजनेवरुन आता महायुतीचे डोळे उघडलेले आहेत. या योजनेचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडतो आहे. त्यामुळे आता ती योजना बंद करायला हवी. तसेच आता महायुतीच्या हालचाली देखील सुरु झालेल्या आहे. असा धक्कादायक खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे.
तसेच आता महाविकास आघाडीची एवढीच प्रार्थना आहेत की, ज्या महिलांना पैसे दिलेत ते काढून घेऊ नका. तसेच त्यांना नोटीस पाठवून पैसे जमा करा असे देखील सांगू नका. कारण तुम्ही काहीही करु शकतात. हे जे काही सुरु आहे, त्यावर आमचं देखील बारीक लक्ष आहे असं संजय राऊत म्हणाले आहे.
लाडकी बहीण योजना; घरात या 7 वस्तू असतील, तर महिलांना 6 वा हप्ता मिळणार नाही. नवीन नियम पहा
Sanjay Raut l लाडक्या बहिणींची मतं विकत घेतलं :
याशिवाय कोणतीही शाहनिशा न करता सरसकट 1500 रुपयांचा जो व्यवहार केला त्यावर देखील अनेकांचा आक्षेप होता. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निकष बदला असे सांगितलेले आहे. दरम्यान, याआधी निकष न बदलता पाच महिन्याचे पैसे देण्यात आलेले आहेत.
कारण 1500 रुपयाला लाडक्या बहिणींची मतं विकत घेण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणुकीत झाला आहे. मात्र ती लाच होती. तेव्हा त्यांना निकष, नियम, कागदपत्रं यासंदर्भात भान देखील राहिलेल नाही. फक्त त्यांना विधानसभा निवडणुकीत मत विकत घ्यायची होती असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहे..