SSC Recruitment 2023 ; एस एस सी भरती 2023 :- Staff Selection Commission ( स्टाफ सिलेक्शन कमिशन ) कडून नवीन भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले असून अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज करण्यास वेबसाईट पूर्णपणे चालू केलेली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 अशाप्रकारे निश्चित करण्यात आलेली आहे. यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत यातील विविध संवर्गातील पदे भरली जाणार असून याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती खाली पीडीएफ मध्ये दिलेली आहे. त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त जागा : – 1876
रिक्त पदाचे नाव : –
1) दिल्लीतील पोलिस उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) 109 जागा
2) दिल्लीतील पोलिसा उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) 53 जागा
3) CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1714 जागा
स्टाफ सिलेक्शन पात्रता : –
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी मान्यता प्राप्त असलेल्या कोणत्याही विद्यापीठाकडून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी घेतलेली असावी. आणि दिल्लीतील पोलीस उपनिरीक्षक मध्ये ( कार्यकारी केवळ पुरुष ) शारीपरिक सहनशक्ती आणि मानव चाचण्यांसाठी निश्चित केलेल्या तारखेनुसार अशा प्रकारे परवाना धारण ड्राइविंग परवाना धारण करणे आवश्यक आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन वयाची अट :–
1 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे. SC आणि ST गटातील उमेदवारांना अतिरिक्त पाच वर्षे सूट असून ओबीसी उमेदवारांना अतिरिक्त तीन वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.
परीक्षा फी :-
General Category/ OBC Category :– 100/– रुपये
( SC/ST/Ex service Man /महिला :– फी नाही )
पगार :- 35,000/- रूपये – 1,12,000/– रुपये
( एस 6 नुसार पे स्तर ) ( मूळ वेतनाव्यतिरिक्त, उमेदवारांना इतर प्रकार चे भत्ते आणि फायदे देखील दिले जातात. )
नोकरी ठिकाण :– संपूर्ण भारतात
अर्ज करण्याची पद्धत :– ऑनलाईन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख :– 15 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in