Vanshavali: वंशावळ म्हणजे काय ? वंशावळ कशी काढायची ?

Vanshavali: वंशावळ म्हणजे काय? वंशावळ कशी काढतात? त्याचप्रमाणे याचा काय फायदा होतो याची पूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये घेणार आहोत

वंशावळ म्हणजे काय ?


वंशावळ म्हणजे आपल्या जुन्या पिढीची संपूर्ण माहिती. यात आपले पूर्वज काय करत होते? त्यांचा काय व्यवसाय होता. व ते कसे उदारनिवार्ह करत होते? व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण माहिती. त्यामध्ये किती पुरुष व किती? महिला किती? बालके होते. प्रत्येक पुरुषाचं कार्य काय होते, घरचा कर्ता पुरुष कोण होता, पूर्वी पासूनच आडनाव हेच आहे. का? वा मध्ये कुठे बदलले आहे का. पूर्वज उदरनिर्वाहासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करत होते. शेती करत होते, नोकरी करत होते, किंवा व्यवसाय करत होते, इत्यादी संपूर्ण माहिती वंशावळ मध्ये मिळत असते.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास असतो.

हे पण महत्त्वाचं आहे 👉 Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; ( संपूर्ण माहिती)

वंशावळ कशासाठी लागते ?
विविध शैक्षणिक लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र काढावे लागते. हे जात प्रमाणपत्र काढत असत असताना जुन्या रेकॉर्ड चा आधार घयावा लागतो. जुन्या नोंदीमध्ये आपल्या नावासमोर कोणत्या जातीचा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार त्या जातीचे प्रमाणपत्र मिळत आसते. नवीन पद्धतीनुसार जन्म नोंद केल्यांनतर बालकाच्या नावासमोर जात न लावता फक्त आडनाव लिहले जाते, त्यामुळे नवीन नोंदीनुसार जात प्रमाणपत्र निघत नाही. त्यासाठी वंशावळीचा आधार घेतला जातो. हे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जेव्हा जात पडताळणी होते. त्यावेळेस वंशवाळीच्या आधारे त्याला मान्यता मिळते.

वंशावळ कशी काढायची ? वंशावळ कशी तयार करावी ?
अनेक जनाना प्रश्न पडतो की ही वंशावळ कशी काढावी? तर आपण आज ते पाहुयात.

जर तुम्हाला जात प्रमाणपत्र काढायचे असेल तर, वंशावळी चे प्रतिज्ञापत्र लागते. म्हणजे जात प्रमणपत्र साठी वंशावळ काढणे आवश्यक असते. हि वंशावळ दाखला काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावे माहित असणे आवश्यक आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

त्या साठी तुम्हाला तुमच्या पूर्वजांचेनाव उदा. खापर पणजोबा त्यानंतर त्यांना असलेली मुले मुली म्हणजे पंजोबा व त्यानंतर त्या पंजोबाला असलेली मुले मुली म्हणजे आजोबा, आजोबांना असलेली एकूण मुले आणि आजोबाची मुले म्हणजे तुमचे वडील आणि तुमचे नाव असा क्रम जोडावा लागत असतो. म्हणजे की खापर पंजोबापासून ज्या व्यक्तीचे प्रमाणपत्र काढायचे आहे. त्याच्या नावापर्यंत हि वंशावळ लिहावी लागते.

समजा एखाद्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र काढायचे आहे. तर महत्त्वाच त्या व्यक्तीला त्याच्या पणजोबा खापर पणजोबा यांच्या नावासमोर कुणबी असा उल्लेख असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना: जेष्ठांना मिळणार 3000 रुपये! ऑनलाईन अर्ज सुरु Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply

वंशावळ कुठे मिळेल ?


तर तहसील कार्यालयामध्ये हे जे जुने हक्क नोंदणी विभाग असतो. तेथे कोतवाल बुक मध्ये जन्म मृत्यू ची नोंदवही असते. त्यामध्ये आपले जुने नोंद जपून ठेवलेले असतात. त्यात जन्म मृत्यूची नोंदी असतात. तर रीतसर अर्ज करून तहसील कार्यालयात या नोंदणी पाहता येते. या पूवजांच्या नोंदी मिळवून त्यामध्ये आपणास पूर्वजांच्या नावासामोल कुणबी उल्लेख असेल तर या नोंदीचा दाखल जोडून त्या व्यक्तीलाही कुणबी प्रॉम्प्टरसाठी अर्ज करता येतो व कुणबी प्रमाणपत्र मिळवता येते. या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीचे आजोबा खापरपणजोबा म्हणजे पूर्वज शिकेलेले असतील तर आणि त्यांनी त्या काळात जातीची नोंद केली असेल तर म्हणजे त्यांच्या जुन्या शैक्षणिक कागतपत्राच्या नोंदीमध्ये जातीचा उल्लेख असेल तर या शैक्षणिक नोंदीचा आधार घेऊनही त्या पिढीतील व्यक्तीस कुणबी प्रमाणपत्र काढता येते.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

वंशावळ काढणे जबाबदारी कोणाची ?


ज्या व्यक्तीला जात प्रमाणपत्र काढावयाचे आहे. यासाठी त्याने अर्ज केला आहे. अशा अर्जदाराची हि जबाबदारी असते. त्याला स्वतः वंशावळ तयार करावी लागेल, स्वतः सर्व नावे लिहून वंशावळ बनवावी लागते. वंशावळीचा कुठे अशी अर्ज करण्याची पद्धत नाही.

वंशावळीनुसार कुणबी नोंद सापडल्यास इतरांना देखील फायदा होतो का ?

जुन्या नोंदीमध्ये पूर्वजांच्या नावासमोर कुणबी नोंद आढळली तर त्यांच्या पुढील सर्व पिढ्याना त्या नोंदी आधारे किंवा त्या नोंदीचा दाखल देऊन कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं.

जर एखाद्या भागात एखाद्या कुटुंबात त्याच्या पूर्वजांमध्ये कुणबीची नोंद सापडली तर त्या भागातील सर्वच कुटुंबाना त्याचा लाभ मिळेलच असे नाही. त्यासाठी प्रत्येकाला आपल्या कुटुंबाच्या इतिहास नोंदी काढून कुणबी नोंद सापडलेल्या कुटुंबाशी कसे नाते संबंध आहेत. याचे कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करावे लागते. म्हणजेच की, कुणबी नोंद आढळलेल्या कुळातील आम्ही वंशज आहोत. हे सिद्ध करावे लागते.

वंशावळ काढण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360