भुजबळांच्या मंत्रीमंडळ एंट्रीसाठी धनंजय मुंडेंची विकेट?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ उडाली

Vijay Wadettiwar | बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Case) सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत. सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) हा धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा आहे. सध्या कराड हा तुरुंगात असून त्याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावेत, अशी मागणी विरोधी गटाकडून करण्यात येत आहेत. मात्र, सध्या वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहेत. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणीही आता जोर धरू लागलेली आहेत. (Vijay Wadettiwar )

या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना आज (2 जानेवारी) कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधलेला आहे. माध्यम प्रतिनिधींनी त्यांना अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाराजीबाबत विचारले. यावर बोलताना वडेट्टीवार यांनी सूचक विधान केलं आहे.

अजितदादा शांत म्हणजे, कुछ तो गडबड है…

E Shram Card Pension Yojana 2024
ई श्रम कार्ड असल्यास मिळत आहेत महिन्याला 3,000 रुपये, असा करा ऑनलाईन अर्ज!

त्यांच्याकडे नाराजी व्यक्त करून पर्याय काय आहे? एक तर भाजपकडे जा नाहीतर घरी बसा.  त्यामुळे ओबीसी नेत्याचा महाराष्ट्रात सरकारने दुरुपयोग केला आहे. त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवलंय.भुजबळ यांना भोपळा दिला. ओबीसीला गृहीत धरून ओबीसीच्या भावनांशी खेळणारं हे सरकार आहे. त्यामुळे भुजबळ यांच्याकडे आता फार पर्याय नाही, असं वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) म्हणालेले आहे.

तसंच पुढे बोलताना त्यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनाही टार्गेट केलं‌ आहेत. “धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा समावेश करण्याचा विचार अजितदादांच्या मनात आहे काय?, अजितदादा या प्रकरणात अजिबात बोलत नाहीत. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना अजितदादा शांत बसलेले आहेत. यात कुछ तो गडबड है…”, असं विजय वडेट्टीवार म्हणालेले आहे.

“मोठ्या आकाला वाचवण्यासाठी…”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीत नक्कीच काही तरी झालेले असेन. भुजबळ यांना देशाचा ओबीसीचा नेता भाजप करेल, तो पर्याय भुजबळांना खुला राहणार आहे, असंही पुढे विजय वडेट्टीवार म्हणालेले आहे. त्यांचं हे विधान आता चर्चेत आलं आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात देखील अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे.

Anganwadi Bharti 2024
अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती सुरू; पात्रता पहा! ऑनलाईन अर्ज येथे करा Anganwadi Bharti 2025

दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडबाबतही मोठा दावा केलेला आहे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा (वाल्मिक कराड) एन्काऊंटरही होऊ शकतोय, एका जवळच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने मला हे सांगितलं असल्याचं वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) यांनी म्हटलेलं आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360