मुलींना मिळणार 1 लाख रुपये; लेक लाडकी योजना झाली सुरू, असा करा अर्ज 2024 ( Lek Ladki Yojna 2024 )

Lek Ladki Yojna Maharashtra 2024 ; महाराष्ट्र राज्यभरातील गरीब कुटुंबांमधील मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळात योजनेला मंजुरी दिलेली आहे. चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत असताना लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आलेली होती. आणि तेव्हाच महाराष्ट्र राज्यात लेक लाडकी योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला होता. या योजनेमुळे मुली अठरा वर्षाच्या होईपर्यंत लखपती होणार असून योजनेचा फायदा हा राज्यभरामधील लाखो गरीब कुटुंबातील मुलींना होणार आहे.

1000044071 मुलींना मिळणार 1 लाख रुपये; लेक लाडकी योजना झाली सुरू, असा करा अर्ज 2024 ( Lek Ladki Yojna 2024 )


लेक लाडकी योजनेमागे मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना मिळवून देणे, मुलींचा मृत्यू दर प्रमाण कमी करणे, तसेच बालविवाह रोखणे, आणि कुपोषण कमी करणे, आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, असे प्रमुख उद्देश घेऊन राज्य सरकारने लेक लाडकी योजना सुरू केलेली आहे.

1000362239 नवीन मंत्रिमंडळात कोणते खाते कोणाला मिळाले? यादी आली समोर! मंत्रिमंडळ विस्तार मोठी बातमी आली
नवीन मंत्रिमंडळात कोणते खाते कोणाला मिळाले? यादी आली समोर! मंत्रिमंडळ विस्तार मोठी बातमी आली

लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत केवळ पिवळे व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलींचा जन्म झाल्यास त्या कुटुंबाला प्रथम वेळी पाच हजार रुपये देण्यात येणार आहे.
मुलगी इयत्ता पहिली मध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये देण्यात येतील.
मुलगी सहावी मध्ये गेल्यानंतर सात हजार रुपये देण्यात येतील.
अकरावीत असताना आठ हजार रुपये, आणि एकूण मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये अशा पद्धतीनं लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींना एकूण १ लाख एक हजार ₹ रुपये एवढा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच की ही योजना मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत लखपती बनवणारी योजना आहे.

📣👉 लेक लाडकी योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

📣 👉 हे पण महत्त्वाचं आहे..! महाराष्ट्रत 40 पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर..! ; Drought Declared In Maharashtra

  • लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या अथवा एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेच्या माध्यमातून वरील नमूद केलेली रक्कम मिळेल.
  • दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर जुळी आपत्ती जन्माला आली असतील, तर एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेले करणे गरजेचे आहे.

1000316153 आज सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण; नवीन दहा ग्रॅम चे सोन्याचे भाव पहा! Gold Rate Today
आज सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण; नवीन दहा ग्रॅम चे सोन्याचे भाव पहा! Gold Rate Today
  • एक एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आलेल्या असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर दोन जुळ्या मुली असतील तर दोघींना देखील स्वतंत्र लाभ देण्यात येणार आहे.
  • लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबाच वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे अशा प्रकारची अट निश्चित करण्यात आलेली आहे.

🛑📣📣 आता सर्वांना मिळणार आयुष्यमान कार्ड, असा करा ऑनलाईन अर्ज ; आयुष्यमान भारत कार्ड | Ayushman Card Online Apply


बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

महाराष्ट्र राज्य सरकारने महिला सक्षमीकरणाच्या धोरणाच्या अंतर्गत हा निर्णय घेतलेला असून लेक लाडकी योजनेमुळे राज्यभरातील लाखो कुटुंबांना लेक लडकी योजनेचा फायदा होणार आहे. मुलींच्या शिक्षण खर्चाची पालकांना जी चिंता पडलेली असते. ती पूर्णपणे मिटून जाईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना व्यक्त केलेला आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360