Pm kisan maandhan yojna ; केंद्र सरकार कडून अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना राबवली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना मासिक 3,000 रूपये पेंशन दिले जाते आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अटी/शर्ती/पात्रता काय आहेत? याबद्दल संपूर्ण माहिती पाहुयात.
1) प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत वय-वर्ष 18 ते 40 वयोगटातील शेतकरी लाभ घेऊ शकता.
2) वयानुसार शेतकऱ्यांना 55-200 रूपये दर महिन्याला भरावे लागतात.
3) योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना वयाच्या 60 पासून 3000 रुपये मासिक पेंशन सुरू होणार आहे.
अल्पभूधारक तसेच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वृद्धापकात आर्थिक सुरक्षा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हि योजना सुरू केलेली आहे. तुम्ही सुद्धा या योजनेचा अवश्य लाभ घ्यावेत. योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्या जवळच्या CSC केंद्रावर भेट द्यावी लागते.
हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा तसेच शेतीविषयक महत्त्वाच्या योजना, तज्ञांचे हवामान अंदाज, सर्व बाजारभाव, सरकारी योजनांची माहिती आणि इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुप नक्की जॉईन करा.