Heavy Rain Compensation: महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर ते नोव्हेंबर 2023 अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेले शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण 1071 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेली आहेत.
यामध्ये बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, आणि अमरावती अशा सुमारे अकरा जिल्ह्यामधील 15.9 लाख शेतकऱ्यांना अशी भरपाई दिली जाणार आहे. आणि या पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देत त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे ( Direct Benifit Transfer ) पाठवण्यात येणार आहे.
पुर, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी याचा मुख्य उद्देश आहे. तसेच पात्रतेचे निकष केंद्रशासनाने अशा नैसर्गिक आपत्तीच्या साठी ठरवून दिलेल्या निकषांचे पालन करत आहे.
हे पण महत्त्वाचं आहे 👉 आता सर्वांना मिळणार आयुष्यमान कार्ड, असा करा ऑनलाईन अर्ज ; आयुष्यमान भारत कार्ड | Ayushman Card Online Apply
या पुरासाठी 24 तासात 65 मिनीपेक्षा जास्त पाऊस आणि बाधित असणाऱ्या जिल्ह्यामधील 33% गावांमधील पिकांचे निकष हे राज्य निकष लागू असणार आहे. तथापि पुरग्रस्त असलेल्या भागासाठी पर्जन्यमानाची मर्यादा करण्यात आलेली आहे.
या नुसकान भरपाई मुळे बाधित असणारे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानी पासून दिलासा मिळेल. आणि पुढील हंगामात त्यांना पुन्हा शेतीची कामे करण्यात प्रोत्साहन मिळणार आहे.
ज्या अकरा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळणार आहे त्यांची यादी पुढीलप्रमाणे – बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, अमरावती, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे.