मोदी आवास योजना अर्ज सुरू..! “या शेतकऱ्यांचे” तात्काळ घरकुल मंजूर होणार ; Modi Awas Yojana

Modi Awas Yojana : ज्या व्यक्तींना आतापर्यंत कोणत्याही गृह निर्माण योजनेच्या अंतर्गत अनुदान लाभ मिळालेल्या नाही. अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना घरी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान गृहनिर्माण योजना ( प्रधानमंत्री आवास योजना 2024 )मंजूर केलेली असून त्याच्या अंतर्गत आता त्यांना अनुदान मिळणार आहे.

या योजनेच्या अंतर्गत आवाज प्लस प्रणालीच्या प्रतीक्षा यादी मध्ये असलेल्या परंतु वरील स्वयंचलित यादीतून नाकारलेल्या पात्र लाभार्थ्यांना तसेच जिल्हा निवड समितीने शिफारस केलेल्या सर्व व्यक्तींना तसेच इतर दुर्बल घटकातील अर्जदार यांना याच्या अंतर्गत लाभ देण्यात येईल. आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्ती या सहजरीत्या या योजनेचा लाभ घेऊन घरासाठी अनुदान मिळवू शकतात.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी किंवा त्यांच्या सध्याच्या जुन्या कच्च्या घराला पक्या घरामध्ये रूपांतरित करण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत १.२ लाख ₹ रुपयांचे आर्थिक सहाय्य देणे अशा प्रकारची या योजनेचे उद्दिष्ट आहे. घराचे किमान आवश्यक क्षेत्र हे 269 चौरस फूट असणे आवश्यक आहे. याच्या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमधील व्यक्तींना लाभ दिला जाणार आहे. व खाली नमूद कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

📣🛑👉 हे पण महत्त्वाचं आहे 👉 महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..!

या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची निवड हे ग्रामसभेद्वारे करण्यात येणार आहे. कोणत्याही लाभार्थीसाठी जर साईट पडताळणी प्रलंबित असेल तर निवड करण्यापूर्वी ते पूर्ण करण्यात येणार आहे. ग्रामसभेने निवड केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्याकडून लाभार्थ्यांची तालुकास्तरीय तपासणी केली जाते आणि त्यानंतर तुम्हाला घरासाठी चे अनुदान मंजूर होते आणि ते अनुदान आपल्याला मिळते.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र लाभार्थी आहेत?

  • भूमिहीन कुटुंब ज्यांच्या मालकीचे कोणतेही पक्के घर नाही
  • ज्या कुटुंबांकडे कच्चे घर आहे. परंतु त्याचा दर्जा सुधारण्यासाठी अनुदान देण्यात येते किंवा ज्यांच्या मालकीची स्वतःची शेतजमीन नाही त्यांना देखील लाभ देण्यात येतो.
  • घर बांधण्यासाठी ज्यांच्याकडे जमीन आहे. असे बेघर कुटुंब
  • ज्या कुटुंबांची जमीन आहे. आणि ज्यांचे घर नैसर्गिक आपत्तीत नष्ट झाले आहे.

सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज सुरू ; Solar Pump Yojna Online Apply

योजनेच्या अंतर्गत लाभ मिळायचा असल्यास पात्र लाभार्थ्यांना त्यांच्याकडे आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची झेरॉक्स अशा प्रकारचे कागदपत्रे आवश्यक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपले पॅन कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो, इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. आणि ही आर्थिक मदत पत्र व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या माध्यमातून पाठवण्यात येते.

या योजनेचा लाभ हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमधील ग्रामीण कुटुंबांमधील घरे निर्माण करून देणे, हे प्रधानमंत्री गृहनिर्माण योजनेचे मुख्य उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली असून त्यामुळे ग्रामीण भागामधील लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारणे,अशा प्रकारचा यामागे हेतू देखील निश्चित करण्यात आलेला आहे.

Leave a comment

Close Visit Batmya360