Tur Bajarbhav Maharashtra : आज महाराष्ट्रात तुरीला किती मिळाले दर? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Tur Bajarbhav Maharashtra:  मागच्या खरीप हंगामात चांगला दर नव्हता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल साठवून ठेवलेला आहे. दर वाढतील या अपेक्षेने शेतमाल साठवून ठेवला असून मागच्या हंगामातील तुरीसुद्धा अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत साठवून ठेवले आहेत मागच्या काही महिन्यांपासून तुरीचे दर हे स्थिर आहे. ८ हजार ते १० हजारांच्या दरम्यान तुरीला दर मिळत आहे  आणि यंदा तुरीचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

कारंजा, अकोट, अकोला, अमरावती,हिंगणघाट, मलकापूर या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक होताना दिसत असून ७ हजार ते ११ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल रूपयांच्या दरम्यान तुरीला दर मिळताना दिसते आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जासाठी फक्त हि चार कागदपत्रे लागत आहेत mukhymantri Ladki bahin yojana

आजच्या किमान आणि कमाल दराचा विचार केला असता आज लासलगाव बाजार समितीमध्ये राज्यातील सर्वांत कमी दर म्हणजे केवळ ८ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळालेला आहे. तर कारंजा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ११ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळालेला आहे. येथील कमाल दर हा १३ हजार १०२ रूपये एवढा पहायला मिळालेला होता. तर येथे आज ५०० क्विंटल तुरीची आवक झालेली होती.

Leave a comment

Close Visit Batmya360