आज बारावी चा निकाल होणार जाहीर; या वेबसाईटवर पहा निकाल 12th Result

12th Result : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये 12 वी बोर्डाची ही परीक्षा घेण्यात आली होती. आज रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Maharashtra 12th result 2024 date

आज मंगळवार दिनांक 21/05/2024 रोजी दुपारी 1.00 वाजता 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ Maharashtra 12th result 2024 link👇

निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाइन जाहीर केला जाईल: HSC Board Result

१) mahresult.nic.in
२) https://hscresult.mkcl.org
३) https://mahahsscboard.in
४) https://results.digilocker.gov.in
५) http://results.targetpublications.org

डिजीलॉकरमध्ये गुणपत्रिका संग्रहित करता येणार आहे. परीक्षार्थींच्या विषयनिहाय गुणांची माहिती या संकेतस्थळांवरून उपलब्ध होणार आहेत.आणि त्याची प्रिंटआउट देखील घेता येईल. तसेच डिजीलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
HSC Board Result

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन प्रक्रिया विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही एका विषयाच्या गुणांची गुणपडताळणी करण्यासाठी तसेच किंवा त्या विषयाच्या उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. २२ मे ते ५ जून या कालावधीत http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येईन आणि शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईन. HSC Board Result

Leave a comment

Close Visit Batmya360