K S hosalikar Mansoon: दिनांक 7 जून रोजी मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यात दाखल झाल्याचे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी जाहीर केल. तसेच मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल परिस्थिती आहेत.
लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. पुढील चार दिवस हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केलेला असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. Weather forecast Maharashtra
१ जून पासून संपूर्ण देशभरात होणार हे महत्वाचे बदल; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम होणार? 1 June 2024 rule change
राज्यात 9 जून, 10ज जून, 11 जून दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे. राज्यात 9 जून रोजी सांगली, रायगड, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नगर, सांगली, सातारा, रत्नागिरी, पालघर, नाशिक, आणि ठाणे या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.
लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्रभर सक्रिय होणार असल्याची माहिती नुकतीच देण्यात आलेली आहे, आणि उकड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी शेतकऱ्यांना जमिनीमध्ये चांगली ओल झाल्यानंतर पेरणी करावीत, व पहिल्या पावसावर पेरणीची घाईगरबड करू नयेत.